अनुष्का शंकर आणि ‘तिसरा लाइट’

सतारीचे सूर मला नेहमीच एक चैतन्यमय अनुभव देतात, जसं सरोद ह्या वाद्याचे सूर कुठल्यातरी धीरगंभीर अशा अवस्थेत घेऊन जातात आणि बासरीचे सूर मनाला एक दैवी शांतता देतात. शब्दात वर्णन न करता येणाऱ्या मनाच्या ह्या अमूर्त अशा काही अवस्था ज्या तुम्ही फक्त आणि फ़क्त अनुभवूच शकता....