कुठलंही नॅचरल क्रिएशन हे अतिशय सहज असतं आणि निव्वळ म्हणूनच ते सुंदर असतं.

सहज म्हणजेच effortlessly झालेलं. माझ्या मते गोष्टी ह्या सहज घडतात किंवा जेव्हा एखादी गोष्ट सहज घडली असं आपण म्हणतो तेव्हा बरेचदा ती आपल्या कडून करवून घेतलेली असते, आपण फक्त एक माध्यम झालेलो असतो. आता ही गोष्ट सुरवातीला पटायला थोडीशी जड जाऊ शकते कारण ती थोडी आध्यत्मिक पातळीवर जाते आणि आध्यत्मिक गोष्टी ह्या फक्त आणि फक्त स्वानुभवातूनच पडताळता येऊ शकतात. ह्या बाबतीतली काही उदाहरणं द्यायच्या अगोदर मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे कुठलीही निर्मिती जेव्हा घडण्याच्या पातळीवर जाते तेव्हा त्याच्या पाठी असतो सातत्याने केलेला रियाज किंवा सराव आणि अर्थातंच उपजत लाभलेली प्रतिभा देखील (जिला दैवी देणगी असंही म्हणतात). आणि हा नियम सर्व कलाप्रकारांसाठी लागू होतो. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीच्या हातून स्वयंपाक खूप छान होतो मग ती व्यक्ती स्री असो वा पुरुष. अर्थात sixth sense हा असावाच लागतो पण हाताला आणि पर्यायाने मेंदूला सराव हा तितकाच महत्वाचा.
आपले सर्वांचे लाडके बाबूजी म्हणजे श्री. सुधीर फडके त्यांच्या एका मुलाखतीत म्हणले होते की ‘गीत रामायण’ हे त्यांच्या आणि गंदिमांकडून निव्वळ घडलंय जे ऐकताना आपल्याही त्याचा प्रत्यय येतो.
माझे एक तबला वादक मित्र त्यांना गुरुस्थानी असलेल्या श्री. झाकीर हुसेन ह्यांच्या बद्दल एकदा मला म्हणले होते की झाकिरजींनी आज जे काही achieve केलंय ते एका जन्मात मिळवणं केवळ अशक्यच वाटतं आणि त्यांची ही achievement निव्वळ एका जन्माची नसून अनेक जन्मांची असावी असंच वाटतं.
माझा पॉटरी (pottery) शाखे मध्ये काम करणारा मित्र ‘विनय’ नेहमी एखाद्या कुंभाराचं उदाहरण देतो, तो म्हणतो की जेव्हा एखादा कुंभार दिवस भरात एकाच आकाराच्या १००० मातीच्या पणत्या निर्माण करतो तेव्हा हजारावी पणती (किंवा ५००वी ही असेल कदाचित) ही त्याने निर्माण केलेली नसते तर ती त्याच्या sub conscious माईंड कडून घडलेली असते. अर्थात त्याने केलेली नसते म्हणजे त्यात त्याचा अहंकार नसतो तर ती त्याच्या अंतर्मनाने घडवलेली असते इतकंच.
माझा आवडतीचा विषय म्हणजे visual arts अर्थातच Painting, Drawing, Graphic art, Sculpture वगैरे वगैरे. त्यामुळे कुठलंही चित्र किंवा कलाकृती बघतांना त्यामधे मी सर्वात आधी observe करत असतो ती त्यातली सहजता. कारण माझ्या मते त्यावरूनच तर त्या कलाकाराच कॅलिबर ओळखता येतं. अर्थात हाच निकष जरी प्रत्येक वेळी नसला तरीही effortlessness खूप काही सूचित करून जातो. असं म्हणतात की एखाद्या आर्टिस्ट च्या निवळ एका स्ट्रोक मधे त्याची आयडेंटिटी असते. स्पॅनिश आर्टिस्ट पिकासोची रेष हीच त्याची आयडेंटिटी होती. पिकासो सारख्याच कुठल्याही महान आर्टिस्टने रेखाटलेली रेष ही एका रात्रीत जन्माला आलेली नसते तर त्या रेषेचं वय देखील हे त्यांच्या शरीराच्या किंबहुना त्यांच्या मना इतकंच mature असतं. तो एक अतिशय सुंदर वाक्य म्हणालेला……की “It took me just 4 years to paint like Raphael but a lifetime to paint like a child”.
हे म्हणजे कलानिर्मिती संदर्भातलं पिकासोचं ब्रह्म वाक्यच म्हणायला हवं. कारण ह्या वाक्यामध्ये त्याच्या अख्या कलाप्रवासाचं सार दडलेलं आहे. (Raphael हा रेनेसान्स काळातला एक नावाजलेला इटालियन आर्टिस्ट होता त्याने निर्माण केलेली पेन्टिंग्स ही रिऍलिझम ह्या कला प्रकारातली बेंच मार्क्स आहेत).

La Belle Jardiniere, राफाएल ची एक कलाकृती

पिकासोने वयाच्या १४व्या वर्षीच राफाएल इतकं रिऍलिस्टिक पद्धतीने पेंट करण्यात निपुणता मिळवलेली. त्याने ही style जरी आयुष्यभर continue केली असती तरीही तो great म्हणूनच ओळखला गेला असता. पण एकाच style मध्ये गुंतून नं राहता तो सतत निरनिराळे प्रयोग करत राहिला. रिऍलिस्टिक पासून सुरु झालेला त्याचा कला प्रवास हा एखाद्या सतत प्रवाही असलेल्या पाण्यासारखाच होता. त्याने वेगवेगळी माध्यम वापरून paintings केली, sculptures केली. आयुष्यात कुठल्याही आर्टिस्टला हेवा वाटावा असं यश, कीर्ती आणि पैसा मिळावंला. पण तरीही सातत्याने वेग वेगळे प्रयोग करत त्याने कलेला एक वेगळा चेहेरा दिला. कला हे प्रत्येकाचं वयक्तिक प्रकटीकरण आहे आणि माणसा गणिक त्यात विविधता असते आणि जी असायलाही हवी. ह्याचाच अर्थ त्याला दिसलेलं जग हे त्याने काढलेल्या चित्रां सारखं होतं. त्याने निव्वळ त्याला दिसलेली किंवा जाणवलेली रिऍलिटी स्वतःच्या कलानिर्मिती मधून प्रकट केली. आज पर्यंत अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले आहेत आणि ह्या पुढेही होत रहातील पण पिकासो सारखा फक्त एकच झाला.

(Sorry! मगाचं पासून ह्या इतक्या थोर व्यक्तीचा उल्लेख मी अरे तुरे असा एकेरी करतोय, कारण खरं सांगायच तर त्याचं काम बघतांना मला तो नेहमीच एखाद्या लहान मुला समानच वाटत आला आहे.)

पिकासो ने वयाच्या १४व्या वर्षी केलेलं एक ऑइल पेन्टिंग.

पिकासोचं Blue Period series मधलं ‘The Tragedy’ हे painting.

पिकासोचं Cubist style मधे केलेलं एक painting

पिकासोने सिरॅमिक माध्यमात देखील प्रचंड काम केलं होतं. त्यातलीच एक ही गोट हेड ह्या विषयावर केलेली प्लेट. रेषा आणि फॉर्म्स मधला बोल्डनेस हीच पिकासोची signature style.

सायकलचं हॅन्डल आणि सीट पासून पिकासोचं A bull Head हे Sculpture.

पिकासो त्याच्या स्टुडिओ मधे

आपल्या एका निर्मितीला न्याहाळताना ‘पिकासो’

पिकासो…..आपली गर्ल फ्रेंड जॅकलिन कडून डान्स चे धडे घेताना. वय वर्ष ७८ की फक्त ८ ? ?? लहान मुलासारखं चित्र येण्यासाठी आधी लहान मुलासारखं व्हावं लागतं.

आपल्या स्टुडिओ मध्ये चिंतनावस्थेत बसलेला पिकासो

माद्रिद च्या पिकासो मुझियम मधलं त्याचं ग्वेर्निका Guernica हे जगप्रसिद्ध painting. Guernica was created by Picasso to express his outrage over the Nazi bombing of a Basque city in northern Spain.

हा तर मी काय म्हणत होतो की वयाच्या ह्या स्टेज पर्यंत पोहोचल्यावर तो काय म्हणतो तर एखाद्या लहान मुला सारखं पेंट करायला यायला मला आयुष्यभर वाट बघावी लागली. मित्रांनो! लहान मुला सारखं म्हणजेच स्वच्छंद पणे, कुठलेही prejudices मनांत नं बाळगता चित्र काढता येणं. म्हणजे त्याने वयाच्या १४व्या वर्षीच कलेमध्ये इतकी निपुणता मिळवली असून देखील तो सतत नवीन प्रयोग करत राहिला, सतत कलेचा अर्थ शोधत राहिला. ९१ वर्षांच्या त्याच्या उदंड आयुष्याच्या शेवटा पर्यंत तो स्वतःमधल्या लहान मुलाला शोधंत राहिला. तो कधीही कुठल्याही style चा गुलाम झाला नाही, प्रत्येक वेळी आधी पेक्षा संपूर्ण पणे नाविन्यपूर्ण अशीच निर्मिती तो कायम घडवत राहिला. म्हणजेच थोडक्यात unlearning चं गुपित त्याला कळलेलं कारण Unlearn करायला शिकणे ह्याचाच अर्थ आपला अहंकार सोडून लहान मुला सारखं अतिशय निर्मळ होणे किंवा कुठलीही गोष्ट सहज घडवण्यासाठी मनाला आणि त्याच बरोबर शरीराला देखील सिद्ध करणं.
गानसरस्वती किशोरीताई आमोणकर नेहमी म्हणत की, “जर का मी गायलेल्या भूप रागाला कोणी प्रतिक्रिया दिली की वाह! किशोरी ताईं काय सुंदर भूप गायलात आज” तर ह्याचाच अर्थ मी त्या दिवशी कुठेतरी कमी पडले. पण ज्या दिवशी माझ्या गाण्याला अशी प्रतिक्रिया मिळेल की वाह! आज काय सुंदर भूप अनुभवायला मिळाला तर तो खरा भूप कारण त्यात किशोरीताईंचं अस्तित्व नसून….. होता तो फक्त ‘भूप’ राग . किती सुंदर विवेचन आहे हे.
Unlearning ही maturity च्या दिशेने घेऊन जाणारी एक process आहे. आणि unlearn ह्याचा अर्थ शिकलेल्या गोष्टी विसरणं नाही तर थोडक्यात अहंकार विसरून त्या विधात्याला पूर्ण पणे surrender होणं असा होतो. कलेचं इतकं अद्भुत प्रकटीकरण घडण्यासाठी माझ्या शरीराची निवड केल्या बद्दल त्या विधात्या पुढे नतमस्तक होणं हेच एखाद्या सिध्दहस्त कलाकाराचं अंतिम ध्येय असतं.

Unlearn करण्याअगोदर आधी learn करणं आलं आणि त्या बरोबर नुसती प्रतिभा असून चालत नाही तर शरीराला आणि मनाला त्या स्टेज पर्यंत पोहोचवण्या साठी लागतो तो रियाझ, रियाझ आणि फक्त रियाझ. अर्थात नुसती गाढव मेहेनत करून उपयोगाची नाही तर योग्य गुरूचं मार्गदर्शन हे हवंच….

ग्रासहॉपर राजेश जोशी / ९८२०१४७४६५
१४ मे २०२०